power to tolerate, power to accept, power to detach our state of mind from situation, power to face, Power to decide our Karma... during this auspicious occasion of Navratri)
कमलपत्री त्या दव बिंदू सम
अलिप्त राहो तुझे रे मन
बाह्य तरंगा कधी न लागो
तव चित्ताचा ठाव
सागर बनूनी घे तू पोटी
विकार पिऊनी हास्यच ओठी
माते सम रे सामावून घे
भले बुरे ते भाव
प्रवाहातल्या खडकावरूनी
कितीक लाटा जाती स्पर्शूनी
ओलावा तो येई क्षण भर
परी निश्चल राही भाव
ज्ञान सागरा तोटा नाही...
उघड्या बघ रे दिशा ही दाही
खेळी परी ही तुझ्याच हाती
तुझाच आहे डाव
काळाच्या या महासागरी
वादळ, वारा, लाटा, लहरी
निश्चल आपुल्या मार्गी राहूनी,
हाक रे धैर्याने तू नाव